लो. टिळक स्मारक संस्था ही संस्था आहे. या संस्थेला १०० वर्षाची परंपरा असून ती नोदणीकृत धर्मादाय संस्था (रजिस्टर फ -१६) आहे. ही संस्था आयकर कलम ८० जी सवलत प्राप्त संस्था आहे.
या संस्थेमार्फत ग्रंथालय, वसंत व्याख्यानमाला, अभ्यासिका असे विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम चालिवले जातात. ही संस्था महाराष्ट्रातील एक महत्वाचे सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. संस्थेमार्फत चालवली जाणारी वसंत व्याख्यानमाला ही गेली ११० वर्षे सातत्याने २१ दिवस सुरू असून त्यामध्ये कला, साहित्य, क्रीडा, विज्ञान आदी विषयांवर प्रबोधनात्मक व्याख्याने आयोजित केली जातात. हे सर्व उपक्रम लोकाश्रयावर चालविले जातात.
संस्थेच्या ग्रंथालयात साठ हजार इतकी ग्रंथसंपदा असून, त्यामध्ये अनेक दुर्मिळ व संदर्भ ग्रंथांचा समावेश आहे. ग्रंथालयाचे ८०० हून अधिक वाचक सभासद आहेत. त्याच बरोबर स्वतंत्र मोफत वृत्तपत्र वाचन विभाग आहे. या ठिकाणी दररोज ५० ते ७० वाईकर नागरिक वृतपत्रे वाचण्यासाठी येत असतात. तसेच पुस्तक, चित्र, अश्या अनेक कलांचे प्रदर्शन भरविण्यात येते. संस्थेच्या रमेश गरवारे सभागृहात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.
संस्थेकडून ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी अभ्यासिका चालवली जाते. यामध्ये मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके, मासिके, संदर्भ ग्रंथ, इत्यादी सुविधा पुरविते. या अभ्यासिकेतून अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये रुजू झाली आहेत.