व्याख्याने
ज्ञानमंच सत्र
श्री. तुकाराम मुंढे (वरिष्ठ सनदी अधिकारी)
पिपल्स ऑफीसर श्री. मुंढे २००५ बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) एक प्रतिष्ठित अधिकारी असून नैतिक प्रशासन पारदर्शकता उत्तरदायित्व व लोक केंद्रीत शासन त्याप्रती असलेली त्यांची ठाम बांधिलकी यासाठी ते ओळखले जातात. शेतीप्रधान व साध्या कुटूंबातून आलेले मुंढे यांचा प्रवास जिद्द, परिश्रम व आत्मविश्वासाचा प्रेरणादायी आदर्श आहे. शेतकरी कामगार व वंचित घटकांच्या समस्या जवळून पाहिल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन बदलला. सामान्य नागरिकांचा विचार केंद्रस्थानी ठेवण्याची प्रेरणा मिळाली. नैतिकतेवर आधारित व लोकहिताला प्राधान्य देणारे प्रशासन खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवू शकते. शासन व्यवस्थेत कार्यक्षमता वाढविणे, सेवा वितरण सुधारणे व नागरिकांना न्याय व वेळेत सेवा मिळवून देण्याचे कार्य केले.
श्री. आनंद वाजपे
महाराष्ट्रभर ओळखले जाणारे कंन्टेन्ट क्रिएटर आणि सायकल प्रेमी. भारतभर सायकलिंग मोहिमा आणि मराठीतून सायकलिंगची माहिती देणारा चॅनेल. ऑस्ट्रेलियातील RMIT युनि-व्हर्सिटी येथून डिझाईन आणि कम्युनिकेशन मधून शिक्षण घेऊ न मुंबई येथील टाटा इन्फोमेडिया कंपनीत सिनियर एक्झिक्युटीव्ह या पदावर कार्यरत राहून पुढे स्वतःचा व्यवसाय सुरू केला. अनेक यशस्वी जाहिरात व ब्रँडिंग मोहिमा यांनी राबविल्या. ई-महाभुमिचा लोगो जो सातबारा उताऱ्यावर वॉटरमार्क दिसतो तोही त्यांनीच डिझाईन केला. पर्यावरण विषयांवर लेखन असलेले त्यांचे अनेक लेख नामांकित प्रकाशनामध्ये प्रकाशित झाले आहे. आयष्यातील एका व्यसनाधिन टप्यातून पूर्णपणे व्यसनमुक्त जीवनाकडे झालेला त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.
श्री. रंगनाथ नाईकडे
एम.एस्सी. अॅग्री. व फॉरेस्ट्री, एम.ए.मराठी तत्वज्ञान, एल.एल.बी., मुख्य वनसंरक्षक म्हणून सेवानिवृत्त. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, पुणे, अलीबाग या जिल्हयात विविध पदावर काम. मुंबई मंत्रालयात खाजगी सचिव म्हणून कार्यरत. शासनाच्या लोकराज्य, बळीराजा शेतकरी आदर्श गांव या मासिकांमध्ये सतत लिखाण. विविध विषयांवर २०० लेख प्रसिद्ध. भगवदगिता, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा व ज्ञानेश्वरी यावर व्याख्याने, प्रवचने व किर्तने. संत साहित्य संमेलनात विविध विषयावंर व्याख्याने. स्पर्धा परिक्षेसाठी कृषी घटक नावाचे पुस्तक. ज्ञान मानस या मासिकाचे मानद संपादक व २५ लेख प्रसिद्ध. गेली २५ वर्ष विद्यार्थ्यांसाठी लिखाण व मार्गदर्शन.
श्री. हेमंत भागवत (रिटा. एअर मार्शल)
एअर मार्शल भागवत यांनी अत्यंत निष्ठेने देशाची सेवा केली. जून १९८१ मध्ये त्यांची भारतीय वायुसेनेच्या प्रशासकीय शाखेत नियुक्ती झाली. ७ वर्षे एअर ट्राफिक कंट्रोल अधिकारी म्हणून काम केल्यानंतर पॅराशूट जंप प्रशिक्षक म्हणून पात्रता मिळविली. १५ वर्षे पॅराटूपर्सना प्रशिक्षण दिले. २० वेगवेगळ्या विमानांमधून २४०० हून अधिक प्रत्यक्ष पॅराशूट उड्या घेतलेल्या असल्यामुळे ते भारतातील सर्वात अनुभवी पॅराशुटीस्ट मानले जातात. वायुसेनेच्या स्कायडायव्हिंग टिम "आकाशगंगा'चेही नेतृत्व केले. त्यांच्या शौर्य आणि सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते वायुसेनापदक, अति विशिष्ट सेवापदक आणि परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. नवी दिल्ली येथील एअर मुख्यालयात एअर इन चार्ज या पदावरून निवृत्ती घेतली.
श्री. सतीश पाकणीकर
शिक्षण एम.ए.एम.एस.सी.पदार्थविज्ञान. गेली ४२ वर्षे औद्योगिक प्रकाशचित्रकार. भारतातील व परदेशातील विविध प्रकाशनांसाठी प्रकाश चित्रण. बऱ्याच ठिकाणी वैयक्तिक प्रदर्शने. २००६ पासून पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात विविध विषयांवरील १७ थीम प्रदर्शने. पॅरिस येथील स्ट्रेट इक्वल द डिझाईन या नामवंत संस्थेत २०१४ मध्ये ३ आठवडे सेलोग्राफी हे नव्या कल्पनेतून साकारलेले प्रदर्शन. कॅलेंडरसाठी गेली २४ वर्षे अनोखी संकल्पना वापरून त्यांची प्रसिद्धी. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासाठी ३ कॅलेंडर निर्मिती. सुमारे ५५५ कलावंतांची ८०००० हून अधिक प्रकाशचित्रे कॅमेराबद्ध. भारतीय टपाल खात्याने प्रसिद्ध केलेल्या पु.ल. देशपांडे, पंडित भीमसेन जोशी व श्रीमती गंगुबाई हनगल यांच्या तीन टपाल तिकिटांसाठी प्रकाशचित्रांची निवड.
श्री. स्वागत थोरात
वन्य जीव छायाचित्रकार, संपादक, दिग्दर्शक ब्रेल विषयक कार्य. १९९८ साली स्पर्शग्रंथ हा ब्रेललिपीतला पहिला दिवाळी अंक प्रकाशित. स्पर्शज्ञान हे देशातील पहिले नोंदणीकृत ब्रेललिपितील मराठी पाक्षिक. रिलायंस दृष्टी मराठीचे मुख्य संपादक. तिसऱ्या ब्रेल लिपी पाक्षिकाचे मुख्य संपादक. महाराष्ट्रातील हजारो अंध व्यक्तिंमध्ये ब्रेल लिपिच्या माध्यमातून मराठी साहित्य वाचनाची गोडी निर्माण केली. २००० साली पु.लं. देशपांडेंचे ३ पैशाचा तमाशा, हे ४४ अंध कलाकारांना घेवून पहिले व्यावसायिक नाटक सलग १८ प्रयोग सादर. पक्षी व प्राण्यांचे वर्तनशास्त्र हा आवडीचा विषय. जंगलगप्पा या कार्यक्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पर्यावरचे जतन करण्यास मार्गदर्शन. असंख्य पुरस्कार प्राप्त.
अजित मराठे
सिव्हील इंजिनिअर पदविका प्राप्त, मुंबई विद्यापिठातून पी.एच.डी. मिळविणारे पहिले विकासक. ग्रॅण्ड इक्विटी मॅनेजमेंट इन रिअल इस्टेट इंडस्ट्री या विषयावर संशोधन प्रबंध सादर. १९९५ मध्ये इंटेरिअरच्या कामापासुन सुरूवात करून अल्पावधितच निर्माण म्हणजेच आताचा एन.आर.डी.एल. हा बॅण्ड तयार केला. एस.आर.ए. आणि रिडेव्हलपमेंट च्या माध्यमातून सामान्यांना परवडतील अशी मुंबईमध्ये घरे बांधून दिली. महाराष्ट्रभर फिरून अनेक उद्योजकांना मार्गदर्शन करतात. आजपर्यंत विविध विषयांवर ५०० हून अधिक व्याख्याने. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे विश्वस्त. मराठी बांधकाम व्याव-सायिक महासंघाचे उपाध्यक्ष. अनेक संस्थांशी सलग्न.
श्रीराम जोशी
पं.दिनदयाल उपाध्याय येथून यांनी हिंदी विद्यापीठाची डी.लीट. पदविका प्राप्त केली. संस्कृतमध्ये एम.ए. व मिमांसा पारंगत पदवी. बी.ए.एल.एल.बी. व पत्रकारितेमध्ये पदवी. विविध वृत्तपत्रे आणि वृत्तसंस्थांमध्ये वार्ताहर, संपादक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांबरोबर विविध देशातील दौरे. जबाबदार पत्रकारितेप्रती असलेल्या आजीवन वचनबद्धतेचे प्रतिक म्हणून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पुढारी पब्लिकेशन प्रा.लि., हिंदूस्थान समाचार डेली तरूण भारत, दिल्ली, दैनिक लोकसत्ता ईत्यादी संस्थांमध्ये वेगवेगळ्या पदांवर कामाचा प्रदिर्घ अनुभव.
श्री.आदित्य चौडे
बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स, सिम्बॉयसिस महाविद्यालय. भारतीय विद्या पारंगत टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे. जर्मन लँग्वेज सी.१ लेव्हल. वाईच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा ससंदर्भ मागोवा घेणारे कसबे वाई हे पुस्तक व सहज काव्य संग्रह प्रकाशित. वाईतील वाडे संस्कृती वस्तुनिष्ठ ऐतिहासिक लेख, फिरस्ती महाराष्ट्राची ई-मासिक. मंदिरस्थापत्य, मुर्ती-शास्त्र विषयांचा अभ्यास व लेखन. काव्यशिल्प, अव्यक्ताची काव्यकथा कार्यक्रमाचे लेखन व सादरीकरण. महाराष्ट्रातील व बाहेरील विविध वारसा स्थळांच्या हेरिटेज वॉकचे नियोजन. कोऱ्या कागदापल्याड या स्वरचित कवितांच्या कार्यक्रमामध्ये सहभाग. मानवाधिकार समाज-भूषण पुरस्कार, संचालक लो. टिळक स्मारक संस्था. पंचक्रोशी साहित्य संमेलन व वसंत व्याख्यानमालेमध्ये व्याख्यानांचे आयोजन.
श्री. विनोद बाबर
एम.बी.ए. व बॅचलर ऑफ जर्नालिझम व व्यवसाय अर्थशास्त्र या विषयात पी.एच.डी. प्रेरणादायी वक्ते व प्रवचनकार. आता थांबायचं नाही या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक. महाराष्ट्राचा प्रेरणादायी आवाज म्हणून ओळख. शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य. छ. शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरू हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी बहुमुल योगदान. हा अभ्यासक्रम शिकविणारे शिवाजी विद्यापीठ हे जगातले एकमेव विद्यापीठ आहे. कराड येथील कृष्णा फाउंडेशन या शैक्षणिक संस्थेत व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत. आनंद मनाचा व यशाचा शिवमंत्र हे प्रसिद्ध सदर. महाराष्ट्राचा प्रेरणादायी आवाज म्हणून गोवा येथे विशेष गौरव. यशाचा शिवमंत्र हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर.
आश्विनी कुलकर्णी
नामांकित आय.टी. कंपनीमध्ये सिनियर टेक्निकल लीड या पदावर कार्यरत. सध्या गाजत असलेल्या श्रीमंत पेशवीण काशिबाई या कादंबरीच्या लेखिका. कल्चरल लेगसी ऑफ भारत या समुहाची संस्थापक. कल्चरल लेगसी ऑफ भारत या समुहाद्वारे समाजाभिमुख सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवितात. त्याचबरोबर कल्चरल लेगसी ऑफ भारत या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून राष्ट्रीय विचारांचा प्रचार आणि प्रसार. समाजमाध्यमे अनेक वृत्तपत्र आणि मासिकांमधून ऐतिहासिक विषयांवर ससंदर्भ लेखन. ऐतिहासिक विषयांवर व्याख्यान. विविध सामाजिक संस्थांमध्ये पदाधिकारी व समाजोपयोगी उपक्रमांमध्ये हिरिरीने सहभाग.
डॉ. अभिजीत तगारे
M.B., B.S.M.S. (Ophthalmology), General O Opthalmology, Glaucoma, Medical Retina, Oculoplasty, Lasik, etc. विद्यापीठात प्रथम श्रेणीत प्रथम. स्वतःचे डोळ्यांचे हॉस्पिटल. विविध नेत्रचिकित्सकांच्या नियतकालिकात १५ सायंटीफिक आर्टिकल्स प्रकाशित. निसर्ग, पर्यावरण, पर्यटन आणि गिर्यारोहण या क्षेत्रातील आवड. गेली ४० वर्षे सह्याद्रीमध्ये व २२ वर्षे हिमालयात ट्रेकिंग. १०० हून जास्त किल्ले भ्रमंती आणि सुमारे २५ हिमालयीन ट्रेक. ६५०० मीटर म्हणजे २०,००० फुट उंचीपर्यंत गिर्यारोहण. विविध कॉन्फरन्समध्ये निमंत्रीत व्याख्याते. विविध पुरस्कार प्राप्त -२०१९ साली ॐ शामा प्रसाद मुखर्जी उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार, २०२३ साली हिंदुस्थान न्यूज गौरव पुरस्कार, २०२६ साली अटल भाषा सेवा सन्मान
डॉ. जगदीश हिरेमठ
बी.जे. मेडिकल कॉलेजचे ऑल राउंडर विद्यार्थी. जे.जे. हॉस्पिटल मुंबई येथे डी.एम. कार्डिओलॉजी मध्ये गोल्डमेडल. मेलबर्न ऑस्ट्रेलियात अँजिओप्लास्टीचं शिक्षण. अमेरिकेत कार्डिओलॉजिस्ट ची फेलोशिप. गेली ३७ वर्ष पुण्यात करोनरी अँजिओप्लास्टी आणि प्रिव्हेंशन ऑफ हार्ट डिसिज या विरूद्ध टोकांच्या विषयांवर विशेष काम. महाराष्ट्रात १९८९ मध्ये अँजिओप्लास्टीची सुरूवात केली व हृदय प्रत्यारोपणाची रूजवात २०१७ साली केली. सध्या देशाच्या आघाडिच्या रूबी हॉल येथे अँजिओप्लास्टी विभागाचे संचालक. आजपर्यंत ८००० अँजिओप्लास्टी चा अनुभव. एका श्वासाचे अंतर हा आकाशवाणीवरील लोकप्रिय कार्यक्रम. DOCS या डॉक्टरांच्या ऑर्केस्ट्राचे गेली २४ वर्ष सुत्रधार.
श्री. विकास खारगे
१९९४ बॅचचे आय.ए.एस. अधिकारी, पुणे विद्यापीठातुन बी.ई. आणि सक्सेस विद्या-पीठातुन एम.ए. सध्या ३० जुलै २०२५ पासुन महाराष्ट्राच्या महसुल विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणुन कार्यरत. त्यांच्या आतापर्यंतच्या विस्तृत कारकिर्दित सचिव, प्रधान सचिव अतिरिक्त महापालिका आयुक्त, व्यवस्थापकीय संचालक आयुक्त मिशन संचालक, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांसारख्या अनेक पदांचा समावेश आहे. त्यांना बरेचसे पुरस्कार मिळाले त्यातील सी.ओ.ई.पी. अभिमान नववा अर्थकेअर पुरस्कार आणि जातीय सलोख्या-साठी दिला जाणारा महात्मा गांधी शांती पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कार मिळाले.
जयराम पोतदार
ज्येष्ठ हार्मोनियम ऑर्गन वादक, अनेक संगीत नाटकांच्या दर्जेदार नाट्य प्रयोगांची प्रस्तुती. विदुषी किशोरी अमोणकर, भारततत्न पंडित भीमसेन जोशी, गंगुबाई हनगल, डॉ. प्रभा अत्रे, डॉ. वसंतराव देशपांडे यांसारख्या अनेक दिग्गज गायकांना हार्मोनियमची साथ. त्यामध्ये बालगंधर्वांचा व त्यांचा घनिष्ट स्नेह होता, त्यामुळे लहानपणापासुनच बाल-गंधर्वांच्या गीत गायकीचे संस्कार झालेले आहेत. आकाश-वाणी, दूरदर्शनवर सुद्धा सादरीकरण केले आहे. त्यांना अनेक विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाले आहेत. (मराठी नाट्यसंगीत संशोधन करण्यासाठी सीनियर फेलोशिप प्राप्त.) मराठी नाटयसंगीताचा तुलनात्मक आणि विवेचनात्मक अभ्यास यावर संशोधन.
निलेश ओक
मुलभूत संशोधनात रमणारे संशोधक. TEDx वक्ता, UAA-ICT चे नावाजलेले विद्यार्थी तसेच उत्तम कि-नोट भाषण देणारे वक्ता म्हणून लोकप्रिय. त्यांनी रासायनिक अभियांत्रीकी-मध्ये बी.एस., एम.एस. केले आणि नंतर एक्झिक्युटिव्ह एम.बी.ए. केले. त्यांची ३ पुस्तके प्रसिद्ध झाली आहे. When did the Mahabharat a War Happened?, The Historic Rama, Bhishma Nirvana. त्यांच्या पुस्तकांची विविध भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. संपूर्ण जगभर प्रवास करत विश्व-विद्यालय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी ते संवाद साधत असतात. त्यांच्या कामाने कादंबरी, माहितीपट आणि चित्रपटांना प्रेरणा दिली आहे. जागतिक संस्कृतीचा गाढा अभ्यास आहे. मॅसॅच्युसेटस्मधील संस्थेत संशोधक.
डॉ. विरेंद्र ताटके
प्राचार्य इंदिरा ग्लोबल बिझनेस स्कूल. २५ वर्षांहून अधिक अनुभव असलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, वित्त क्षेत्रातील तज्ञ आणि विचारवंत त्याचबरोबर नेतृत्व, प्रशासन आणि संघटन कौशल्यासाठीही त्यांना ओळखले जाते. बँकिंग आणि फायनान्स मध्ये पी.एच.डी. फेलो सदस्य, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकौंटंटस् ऑफ इंडिया. सदस्य, चार्टर्ड इन्स्टिट्यूट आफ पब्लिक फायनान्स अॅण्ड अकौंटन्सी, लंडन. सदस्य, असोसिएशन ऑफ म्युच्युएल फंड इन इंडिया. सकाळमध्ये आर्थिकविषयावर अनेक वर्ष लेखन. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन सादर केले असून अनुप्रयुक्त नवकल्पनांबाबत त्यांच्याकडे एक पेटंटही प्रकाशित आहे. बेस्ट फायनान्स टिचर अॅवार्ड, ब्लुमबर्ग – २०१४
अभिजीत जोग
चार बेस्ट सेलर पुस्तकांचे लेखक. असत्यमेव जयते, जगाला पोखरणारी डावी वाळवी, भारताची खरी ओळख : भारत सत्य, सत्व आणि स्वत्व अशी काही पुस्तके प्रकाशित असून ती मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत व काही पुस्तके बंगाली, मल्याळम, तेलुगु आणि गुजराती भाषेमध्येही प्रकाशित आहेत. ते हेरिटेज फर्स्ट या पेजचे लेखन करतात. ते वक्ते, स्तंभलेखक असून भारतीय संस्कृती आणि इतिहास या विषयांवर सामाजिक माध्यमांवर सातत्याने भाषणे आणि लेखन करतात. ते नामवंत ब्रँड कन्सल्टंट असून त्यांचे ब्रँडनामा हे ब्रॅण्डिंग वरील मराठीतले पहिलेच पुस्तक लोकप्रिय आहेत. रोटरी चळवळीच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यामध्ये सहभागी असतात.
डॉ. मंगेश कश्यप
विकासाचा मार्ग शाश्वत कसा असावा? या प्रश्नाला विचारांच्या सखोलतेने आणि कृतीच्या बांधिलकीने उत्तर शोधणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. मंगेश कश्यप. मराठी साहित्य आणि पर्यावरणीय अर्थशास्त्र या विषयांमध्ये पीएच.डी. संपादन करत, बदलत्या जगात मानवी अस्तित्व, विकासाची संकल्पना आणि पर्यावरणीय संतुलन यांचा खोल व चिंतनशील अभ्यास केला. उद्योग, शिक्षण आणि संस्थात्मक नेतृत्व क्षेत्रांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. इंडो-ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे महासचिव, तसेच डी.वाय. पाटील विद्यापीठ, पुणे येथे संचालक, 'अर्थ कम्युनिकेशन्स प्रा.लि.' या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक' सीरम एन्व्हायर्नमेंटल सस्टेनेबिलिटी रिसर्च फाउंडेशन' या संस्थेचे अध्यक्ष म्हणून जल, पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात सक्रिय कार्यरत आहेत.
डॉ.प्रणिता अशोक
एम.बी.बी.एस., एम.डी., (शरीरक्रिया विज्ञान) तसेच पोषण आणि चयापचय या विषयात पी.एच.डी. करून पोषण तज्ज्ञ म्हणून पुण्यात स्वतःचे डाएट क्लिनिक. देशातील विविध मधुमेह संस्थांकडून पुरस्कार प्राप्त, त्याच बरोबर कोरिया, लंडन - ऑक्सफर्ड, सिंगापूर, चीन, अमेरिका, जपान, इटली ईत्यादी देशात शोधनिबंध सादर. अहमदाबाद डाय केअर डायबेटीज इन्स्टिट्यूटचा २०१८ चा यंग पुरस्कार. २०२० मध्ये सुपर वुमन पुरस्कार व २०२३ मध्ये चेन्नई येथे पोषण आणि चयापचय क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधक पुरस्काराने सन्मानित, महिला शास्त्रज्ञ पुरस्कार प्राप्त. एशिया पॅसिफिक वैद्यकीय उत्कृष्टता पुरस्कार.